Showing posts with label Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET 2017). Show all posts
Showing posts with label Maharashtra Teachers Eligibility Test (MAHATET 2017). Show all posts

Tuesday, July 4, 2017

MAHATET 2017 महाटेट २०१७ : Free online practice test & performance analysis

   




Compete Prabodhini way offers free online practice test for 
TET 2017 

मोफत सराव परीक्षा टेट २०१७ 


For free test

  1. Code : TET17
  2. Username : tet17freetest
  3. Password : tet17freetest.



Sunday, July 2, 2017

MAHATET 2017 महाटेट २०१७ : सराव परीक्षांसाठी उपयुक्त संकेत स्थळ

http://www.competeprabodhiniway.com/tet.html



CPW Aims To Provide You Sample Question Papers For TET-Teachers Eligibility Test Examination Through This Online Mock Series. It Provides You Practical Approach To Check Your Preparation For TET Examination. TET Mock Tests Included In This Package Are As Per The Latest Pattern. Our Expert Faculty Has Taken Immense Efforts To Provide You The Best Series Fo-r TET Examination.
Ready made Performance Analysis 
  1. Topic wise
  2. Time wise
  3. Round wise
  4. Risk wise
  5. Difficulty level wise

Saturday, July 1, 2017

महाटेट २०१७ MAHATET २०१७ अभ्यासक्रम पेपर २

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर) 

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :- 

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र:- 

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधरीत प्रश्नांचा समावेश राहील. 

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील. 

(२)भाषा-१ तसेच (३)भाषा-२ 

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१व भाषा-२ विषय घेता येतील. 

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दू
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजी


इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठक्रम लागू राहील. 

४अ) गणित व विज्ञान विषय गट- 

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील. 

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठक्रम लागू राहील. 

४ब) सामाजिक शास्त्रे विषय गट- 

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पन, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. 

प्रचिलत प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६वी ते ८वी च्या अभ्यासक्रमावर मधील संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. 

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. 

संदर्भ:- 

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम 

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठक्रम 

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके 

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

Friday, June 30, 2017

MAHATET 2017 महाटेट २०१७ : अभ्यासक्रम पेपर १

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) 

पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :- 

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील. 

या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील. 

२) भाषा-१ व भाषा-२ 

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा १ व भाषा-२ विषय घेता येतील. 

भाषा-१मराठीइंग्रजीउर्दू
भाषा-२इंग्रजीमराठीमराठी किंवा इंग्रजी


इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील. 

३) गणित:- 

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील. 

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. 

४ परीसर अभ्यास :- 

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील. 

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास. नागरीक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. 

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. 

संदर्भ:- 

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठक्रम 

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके 

Wednesday, June 21, 2017

MAHATET 2017 महाटेट २०१७



महाटेट २०१७ 
महत्वाच्या तारखा :




महत्त्वाचे कार्यक्रमतारीख
ऑनलाईन नोंदणी व अर्ज सुरु होण्याची तारीख१५/०६/२०१७
ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख३०/०६/२०१७
आवेदनपत्राची प्रिंट घेण्याची शेवटची तारीख३०/०६/२०१७
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी१५/०६/२०१७ to ३०/०६/२०१७








ऑनलाईन सराव प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी 

Tuesday, June 20, 2017

MAHATET 2017 (Maharashtra Teachers Eligibility Test) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( महाटेट २०१७ )




नमस्कार,

शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्ज भरून अभ्यासाला सुरुवात झाली असेल. शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयोगी पडतील अशा टिप्स क्रमशः आपल्यासाठी प्रशिक्षकच्या महाटेट २०१७. या पेजवर मांडणार आहे. 

प्रयोगशील शिक्षकांसाठी अनुभवांचे आदानप्रदान व्हावे यासाठीचे व्यासपीठ म्हणजे ‘ प्रशिक्षक’. 
हे ई मासिक ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक उपक्रम संशोधिकेतर्फे प्रकशित करण्यात येते. 

प्रशांत दिवेकर 
वा.ना.दांडेकर शिक्षक प्रशिक्षण केंद्र 
ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

_____________________________________________________________________________________________

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( महाटेट २०१७ ) 

जाहिरात , वेळापत्रक , प्रवेश शुल्क व परीक्षेचा अभ्यासक्रम या बद्दल तपशील जाणून घेण्यासाठी 

खालील संकेतस्थळाला भेट द्या.





प्रशिक्षकच्या या पेजवर आपण परीक्षेचे स्वरूप , परीक्षेची तयारी करण्यासाठीच्या टिप्स , सराव प्रश्न व सराव प्रश्नपत्रिका याबद्दल माहिती घेवू शकाल.

ऑनलाईन सराव प्रश्न पत्रिका सोडवण्यासाठी